आचार्य अत्रे..

[][]
काळाच्या पटलावर अष्टपैलू व्यक्तिमत्वाची भक्कम मुद्रा उमटविणारे थोर नाटककार: आचार्य अत्रे.

एखाद्या व्यक्तिमत्त्वाला अनेक कंगोरे असतात. अत्रे हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते.
एखादं व्यक्तिमत्त्व त्या-त्या काळात समाज मनावर गारूड करतं,एवढेच नव्हे तर जीवनासाठीची शिदोरी, पुढच्या पिढीसाठी सोडून जातं.
अत्रेंच्या नाटकांनी अनेक पायंडे पाडले, विक्रम केलें, तोडलें.
यशस्वी नाटककार अत्रे यांच्या ‘घराबाहेर’ या नाटकां मुळे हाऊसफुल्ल या घोषणेचा जन्म झाला. रॉयल ऑपेरा हाऊसमध्ये ‘घराबाहेर’ चे तिकीटे दोन दिवस आगोदरच विकली जाऊ लागली. रसिकांना तिकीटाची खिडकी बंद दिसू लागली. यावर तोडगा म्हणून हाउसफुल असा फलक लावण्याची व्यवस्था अनंत हरी गद्रे यांनी केली.
‘घराबाहेर’ नाटकाचे अगोदर व त्यानंतर आजपर्यंत कोणत्याही नाटकाचे जिवंत व थेट रेडिओ प्रक्षेपण झालेले नाही.
अत्रे यांच्या प्रत्येक नाट्यकृती ने पराक्रम केले आहेत. अत्रे यांनी दिलेले प्रत्येक नाटक प्रेक्षकांनी यशस्वी ठरवले.
आचार्य अत्रे उत्तम पद्य लेखक होते, ते त्यांच्या नाटकातील त्यांनीच लिहलेल्या नाट्यगीतां नी सिद्ध झालेआहे.
अत्रे शिक्षणशास्त्राचे तज्ञ, अध्यापन शास्त्राचे धडे देणारेआचार्य, पाठ्यपुस्तकाचे लेखकवसंपादक,नियतकालिकांचे संपादक, लोकप्रिय लेखक, विद्वान, शिक्षित व सामान्य जनतेमध्ये लोकप्रिय असलेले विनोदी वक्ते होते.
आचार्य अत्रे यांचे प्रत्येक नाटक, व्यावसायिक नाटकांच्या इतरकेंच यश मिळवायचे.
आचार्य अत्रे हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहे.चित्रपट क्षेत्रातील निर्माता, दिग्दर्शक, लेखक, गीतकार, पटकथाकार, संवादलेखक तसेच नाट्यक्षेत्रातील, पत्रकारितेतील वृत्तसंपादन, वार्तांकन, लेखन, वैचारिक लेखन, संपादकीय अग्रलेख, वृत्तपत्र मालकी, आदर्श मुख्याध्यापक, शिक्षक प्रशिक्षणाचे अनेक वर्ष मुख्याधिकारी, पाठ्यपुस्तक संपादन लेखन व निर्मिती असे विविधांगी कार्य करत असताना समाजाभिमुख राहून समाजस्वास्थ चे रक्षण व संवर्धन करणे, मंगल पवित्र परंपरांचे रक्षण करणे, समाजातील दोषांचे दर्शन, समाजाला मनोरंजक चिमटे काढून करणे, सामाजिक व राजकीय संभावित लुटारूं
ची निर्भीडपणे निर्भत्सना करणे, हे आचार्य अत्रे यांनी सर्वच क्षेत्रात वावरताना केले.
प्रसंगोपात,व्यक्ततीविषयक
अभ्यासपूर्ण अग्रलेखांचे त्यांचे संग्रह प्रतिभेचे व द्रष्टेपणाचे दर्शन घडवतात
निबंध, लेख, एकाच विषयाची माहिती, लेखमाला, लघुकथा, कथा,कादंबरी व चित्रपटाची पटकथा, काव्य, संगीत,नाट्य, काव्य प्रकार,
नाटक व त्याहून अधिक प्रकारचे साहित्य अत्र्यांनी लिहले.
एकच व्यक्ती अनेक क्षेत्रात कार्यरत असते, तेंव्हा त्यांच्या नावां भोवती असलेंल वलंय, दरारा,व आदर कित्येक वर्ष नंतर कायम असतो.
अत्रेंच सर्वच क्षेत्रातलं कार्य अफाट आहे.जेवढ प्रेम अफाट,तेवढंच शत्रुत्व अफाट.
अनेक महत्त्वपूर्ण क्षेत्रात उत्तुंग कामगिरी त्यांनी केली.
एकच व्यक्ती,एकाच
आयुष्यात विविध क्षेत्रात, प्राविण्य संपादन करणारी व्यक्ती म्हणजे अत्रे.
काही व्यत्तीचं कर्तृत्त्व प्रचंड धबधब्या प्रमाणे असतं, त्या धबधब्यात काही वर तुषार, काही वर शिंतोडे, तर काही त्यांत चिंब भिजतात, तर काहीच्या नाकातोंडात पाणी जाते, अत्रे असंच एक व्यक्तिमत्त्व होतं.
अत्रे यांच्या नाटकां बद्दलअसे
म्हणले जाते की आशियातील ते एकमेव व्यक्तिमत्त्व, त्यांची नाटकं कधीच पडली नाहीत. ३ वेळा ते नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष असलेले ते एकमेवंच होतें.
निबंध, एकाच विषयाची लेखमाला, लघु कथा, कथा दीर्घकथा, कादंबरी किंवा चित्रपटाची पटकथा, काव्य, कविता,नाट्यपद आणि विडंबन काव्य प्रकार, नाटक व त्याहून अधिक प्रकारचे साहित्य आचार्य अत्रे यांनी निर्माण केले. व त्यांच्या त्या निर्मितीवर लोकप्रियतेची, यशस्वितेची मोहर मराठी वाचकांनी व प्रांजळ समीक्षकांनी उमटवली, ती यांच्या प्रतिमेला साजेशीच होती.
अत्रे हे थोर नाटककार आहेत,हे समीक्षकांनी वृत्तपत्र संपादक आणि हजारो प्रेक्षकांनी मान्य केले आहे.
हमखास यशस्वी होणारी,टाळ्या व हशा वसूल करणारी नाटकं म्हणजे आचार्य अत्रे यांची नाटकें हे समीकरण पक्के झाले होते.
माणूस क्षितिजाच्या दिशेने कितीही चालला तरी तो क्षितिजापर्यंत पोहचत नाही, तसेच काहीसे अत्रे यांच्या साहित्याचे आहे.
अत्रे यांच्या तो मी नव्हेच या नाटकाने मराठी रंगभूमीच्या इतिहासात अनेक पराक्रम नोंदवलेले.अत्रे यांचे प्रत्येक नाटक मराठी रसिकांनी यशस्वी ठरवलें.
त्यांची अनेक नाटके हाऊसफुल्ल गर्दीत चालत, त्याचे शेकडो प्रयोग अनेक वर्ष होत राहिली.
अत्रे सारखा नाटककार अगोदर झाला नाही व भविष्यात होणार नाही.
अत्रे यांच्या अनेक पैलू पैकी, त्यांचा नाटककार म्हणून प्रवास ,प्रत्येक नाटकाचा इतिहास, त्यांच्या आठवणी,आनंद बोडस यांनी लिहिल्या आहेत.
संबंधित नाटकाविषयी थोडक्यात आशय व त्याची निर्मिती प्रक्रिया याचे विवेचन त्यांनी केले आहे.आठवणी जाग्या केल्या आहेत.
शिक्षणशास्त्रवअध्यापनशास्त्र च्या उच्चशिक्षणासाठी इंग्लंड मध्ये बराच काळ राहत असताना, फावल्या वेळात अत्रे यांनी नाटकाचां बारकाईने अभ्यास केला.
उच्च साहित्यिक मूल्य, काळजाला हात घालणारे़ संवाद, सुरुवातीपासून शेवटचा अंक संपेपर्यंत हृदयद्रावक नाट्यमय घटना व अखेर प्रेक्षकांना हादरवून टाकणारा अनपेक्षित धक्का हे ‘उद्याच्या संसार’ या नाटकाचे स्वरूप होय.
नाटक संपल्यावर अनेक प्रेक्षक रडतच घरी जायचे. काही प्रेक्षक नाटक संपल्यावर मानसिक विदीर्ण अवस्थेत आपल्या खुर्चीत बराच वेळ बसून असायचे.
उद्याचा संसार पाहिल्यावर स्वतः नाटककार असलेले साहित्य सम्राट न. चि केळकर आपल्या उपरण्याने डोळे पुसत, कोणाचा तरी आधार घेत नाट्यगृहा बाहेर पडत असलेले अत्रेंनी व अनेकांनी पाहिले होते.
अत्र्यांनी महाराष्ट्राला खदखदून हसवलें तसे भरपूर रडवलें. हसत खेळत पद्धतीने, चटकदार कथानकाच्या आधाराने व विनोदाच्या शिडकाव्याने,नाटकांच्या माध्यमातून,सामाजिक समस्या लोकांसमोर अत्रे यांनी मांडल्या.
सामाजिक समस्याचे प्रदर्शन करणे व समाजातील दोष यासंदर्भात चिमटे काढणे हे दोन्ही, विनोदी व हास्यविनोदी मार्गांनी अत्र्यांनी पूर्ण केले.
‘लग्नाच्या बेडी’ मधून त्यांनी हेच साधलें. मनोरंजक पद्धतीने प्रेक्षकांना हसवतां हसवतां अंतर्मुख करून विचार करायला भाग पाडले. लग्नाची बेडी, भ्रमाचा भोपळा, घराबाहेर, साष्टांग नमस्कार, ब्रह्मचारी, मी उभा आहे, बुवा तेथे बाया डॉक्टर लागू,तो मी नव्हेच,अशा अनेक नाटकांनी इतिहास घडवला आहे. आजही ही नाटके नव्या दमात सादर झाली तर नक्कीच हाऊसफुल्ल होतात.
अत्र्यांच्या ‘तो मी नव्हेच’ या नाटकाने मराठी रंगभूमीच्या इतिहासात अनेक पराक्रम नोंदवले. तो मी नव्हेच चा शुभारंभाचा प्रयोग दिल्ली येथे झाला , प्रयोग साडेपाच तास चालला. तो मी नव्हेच मधील लखोबा लोखंडे चार-पाच जणांनी साकारला. फिरते रंगमंच ची सुरुवात प्रथमच झाली.मोरूची मावशी मधील टिंगटांग टिंगांग आजही प्रसिद्ध आहे.
अत्रे यांची नाटके स्वयंभू आहेत,अनुवादित नाहीत.
अत्रे यांनी इतिहास निर्माण व्हावा म्हणून नाटके लिहिलं नाहीत,तर त्यांच्या नाटकांनी इतिहास निर्माण केला.
रंगभूमीवर सादर करता येतील,कुटुंबासमवेत पाहता येतील,कमरेवरचे विनोद असलेली नाटकें अत्रे यांनी लिहिली.
त्यांचे प्रत्येक नाटक यशश्री खेचून आणें.मागणी तसा पुरवठा या प्रकारे त्यांनी लेखन केले नाही.यामुळेच ते थोर नाटककार ठरले.
डॉ.अनिलकुलकर्णी.
९४०३८०५१५३anilkulkarnu666@gmail.com

मन

वडील..