ओळखा आपले शरीर – डॉ. आरु लेखमाला

आपले शरीर ओळख – 2
शरीर हे रस, रक्त, मांस इत्यादी ७ शरीर धातूनी बनलेले आहे. परंतु कार्यकारी स्वरूपात शरीराची विभागणी तीन तत्त्वामध्ये केली आहे. ते म्हणजे वात, पित्त व कफ होय. ढोबळ मनाने वात म्हणजे संचरन शक्ती, पित्त म्हणजे रूपांतरण शक्ती व कफ म्हणजे स्थिरिकरन शक्ती होय. स्वतः च्या शरीर प्रकृतीची ओळख याच दोषाच्या आधिक्याने प्रत्यायास येते. कोणाचीही प्रकृती कधीही एक नसते ती दोन दोष किंवा तीन दोष यांनी तयार होते तिदोषज साम्य प्रकृती दुर्लभ आहे. दोन दोषांच्या मध्ये एक प्रधान असतो. वात पित्त, वात कफ किंवा पित्त कफ अशा प्रकृती पाहायला मिळतात तर आज आपण प्राधान्याने वात प्रकृतीच्या शरीराचे वर्णन पाहू.
वात प्रकृतीच्या व्यक्तीची शरीरयष्टी कृश व सडपातळ असते. अत्यंत जलद शारीरिक हालचाली असतात. केस रुक्ष व कडक असतात. शरीरात रुक्षता जास्त असल्याने त्वचा भेगाळलेली खरखरीत व रुक्ष असते. याची प्रचिती हातापायाच्या त्वचेवर प्रामुख्याने पाहावयास मिळते. पित्त प्रकृतीच्या मानाने शरीर नेहमी थंड असते. वातावरणातील शीतलता यांना सहन होत नाही. यांची झोप अत्यंत सावध व कमी असते. फार बोलण्याची, भटकंती करण्याची आवड यांना असते. अवेळी व जलद गतीने जेवण करने, चटकन राग येणे, झोपेत अर्धवट डोळे उघडे राहणे, झोपेत घोरणे, वस्तू चटकन विसरणे इ. लक्षणे यांच्यामध्ये प्रामुख्याने पाहावयास मिळतात.
वात प्रकृतीच्या व्यक्तीना प्रामुख्याने खालील रोग होतात. पाकृत शरीराची वाढ न होणे, उदा . योग्य वयात योग्य वजन वाढणे, शरीराच्या एखाद्या अवयवांची वाढ  गजखडने इ. शीत वातावरण सहन होत नसल्याने सर्दी, पडसे, खोकला, संधिवात , आमवात भेगा पडणे, त्यामधे वेदना असणे, स्त्राव व खाज इ. लक्षणे नसताना देखील जखमा भरून न येणे किंवा परागकण इ. संबंध आला असता दमा, खोकला, शीतपित्त इ. रोगांची अनुभूती येते. चटकन राग येण्याची सवय जडल्याने मानसिक संतुलन चटकन बिघडते. उच्च रक्तदाब, ताण – तणाव, उन्माद, अपस्माद, अर्धांगवायू इ. विकार जडतात. अवेळी व जलद आहार घेण्याच्या सवयीमुळे पचनाने त्रास जडू लागतात.
निसर्गतःच वात प्रकृती चे जे गुणधर्म असतात ते जाणून घेऊन त्या अनुषंगाने आहार विहार केला तर आजारी पडण्याचे प्रमाण कमी होते यासाठीच प्रकृती परीक्षण महत्वाचे सांगितले आहे.
वात प्रकृती ही अत्यंत उत्साही , सतत कामात व्यग्र, अतिशय चपळ, पटापट कामे उरकणारी, जलद विचार क्षमता असणारी, पुष्कळ लोक किंवा मित्र संग्रह, सतत बोलत राहणारी, व्यक्त होणारी , मन मोकळे करणारी अशी छान प्रकृती आहे. प्रकृती नेहमी द्वंद्व असतात एका व्यक्तीची एकच प्रकृती नसते तर त्या वात पित्त किंवा वात कफ अशा असतात तर पुढील लेखात पित्त प्राधान्य प्रकृती जाणून घेऊ.
धन्यवाद

2 प्रतिक्रिया

  1. लेखकांनी सप्तधातूनी शरीर बनले आहे आणि वात-पित्त-कफ यांच्या अनुषंगाने ते कसे व्यवस्थित चालत आहे , याचे अत्यंत व्यवस्थित आणि समर्पक असे वर्णन केले आहे. खरे तर आपल्याच शरीराची आपणाला पूर्ण माहिती नसते, त्या दृष्टिकोनातून हा लेख फारच उपयुक्त अशा प्रकारचा आहे. लेखकांनी शरीरासंबंधी लेखमाला चालु ठेवायचा विचार केलेला आहे, तो अत्यंत स्वागतार्ह आहे. आम्ही आपल्या पुढील लेखाची वाट पाहत आहोत.