आई होणार मी

मज डोहाळे लागले
चिमुकल्याच्या आगमनाचे मज डोहाळे लागले

स्त्रीत्वाची ओळख खरी माझी मला पटली
मातृत्वाची सुंदर देणगी निसर्गाने मला दिली

नऊ महिने नऊ दिवस वाट मी पाहते मज बाळाची
वेदना संवेदना भावना माझ्या जपते, होणार आई मी बाळाची

बाळाच्या बाबांनी दिली मज ही भेट प्रेमाने
बाबा बाळाचे मिरवतात फुशारकी अभिमानाने

डोहाळे आजी-आजोबांनाही लागले
म्हातारपनीची काठी अन् बोबडे बोल ऐकू येऊ लागले

नवनवीन नाते घेऊन येणार बाळ माझे
मज डोहाळे लागले
चिमुकल्याच्या आगमनाचे मज डोहाळे लागले।

कवी – क.दि.रेगे
नाशिक